Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : शिवसेना-भाजपचा महासभेत गोंधळ; माठ फोडला; महापौर मेटाकुटीला

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

आज नाशिक महापालिकेच्या महासभेत जय भवानी परिसरातील पाणीप्रश्न चांगलाच गाजला. पाणीप्रश्नावर तोडगा तर निघाला नाहीच मात्र, शिवसेना भाजपच्या प्रचंड गदारोळात महासभा तहकूब करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, जय भवानी रोड परिसरात पाणी येत नसल्याने शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवेक सुनील बोरसे यांनी महासभेत लक्ष वेधण्यासाठी माठ आणला होता. तसेच जय भवानी रस्त्याचा पाणी प्रश्न मार्गी लावा असा फलकदेखील अंगात घातला होता.

यादरम्यान, महापौरांसमोर त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली मात्र, महापौरांनी ती नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या बोरसे यांनी माठ जमिनीवर आपटला. यादरम्यान माठाचा तुकडे भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या डोक्याला लागले.

या कारणावरून भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यादेखील मेटाकुटीला आल्या होत्या. दरम्यान, महासभा तहकूब करण्यात आली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!