शिवसेनेचा कायनेटीक कामगारांच्या भावनांशी खेळ

0

दिलीप गांधी यांनी राठोडांवर नामोल्लेख टाळून टीका;  भाजप मध्यनगर मंडलाध्यक्षपदी नरेंद्र कुलकर्णी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कायनेटिक कंपनीला लावलेली सील काढण्यासाठी निघालेला मोर्चा अन् यापूर्वी कंपनी मालकाला झालेल्या मारहाणीमुळे नगर औद्योगिक क्षेत्रात पाठीमागे गेले. कंपनीचे अनेक प्रकल्प इतरत्र स्थलांतर झाले. सेना कायनेटक कंपनीच्या भावनांशी खेळत असल्याची टीका खासदार दिलीप गांधी यांनी येथे केली. मध्यनगर भाजप मंडलाची नवीन कार्यकारीणी जाहीर केल्यानंतर गांधी यांनी पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रे दिली.

नगर शहर मध्यनगर मंडलची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष तथा माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांनी घोषित केली. नूतन पदाधिकार्‍यांना शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमातगांधी बोलत होते. उपमहापौर श्रीपाद छिंदम, शहर उपाध्यक्ष नगरसेवक किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, आसाराम ढुस, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुनिल रामदासी, आसाराम ढुस, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले, आज कायनेटिक कंपनीला लावलेले सील काढण्यासाठी मोर्चा काढून आंदोलनाचे नाटक करणार्‍यांनी  तेव्हा कायनेटिक कंपनीच्या मालकांना श्रीमुखात देऊन मारहाण केली. त्याचा फटका नगरच्या औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. फिरोदियांना केलेल्या मारहाणीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी नगरमधून स्थलांतर केले. कायनेटिक कंपनीचा नॅनो प्रकल्पही स्थलांतरीत  झाला. आता मोर्चा काढून जनतेची व कामगारांच्या भावनांशी शिवसेना खेळत आहे. शहरातील मध्यनगर भाग भारतीय जनता पार्टीचा पाठिराखा भाग आहे. त्यामुळे कायम मध्यनगर भागातून सर्व निवडणुकांना भाजपाला उत्स्फुर्त मतदान मिळत आहे. देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने मोठे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशामध्ये सर्वात गतीमान वेगाने वाढणारा पक्ष म्हणून भाजप नावारुपाला आला असल्याचे गांधी यांनी सांगितले. पद दिल्याने आता तुमच्यावरची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे आता पक्षाने मला काय दिले, यापेक्षा मी पक्षाला काय देऊ शकतो. या विचाराने काम केले पाहिजे, असे मत सुनील रामदास यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, सरचिटणीस किशोर बोरा यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर प्रशांत मुथा यांनी आभार मानले. जगताप, राठोडांकडून दिशाभूलशहर विकासाच्या थापा मारणार्‍या आमदार संग्राम जगताप व माजी आमदार अनिल राठोड हे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केली. शहर विकासाच्या गप्पा मारणारे दोघेही प्रयत्नात तोकडे पडत आहेत. आम्ही विकासासाठी निधीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. त्याला यश मिळून शहर विकास झालेला दिसेल असे सांगत छिंदम यांनी आता विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. खासदार दिलीप गांधी यांनी महानगर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य आले आहे. त्यांच्या काळात मनपामध्ये भाजपाची सत्ता आली असल्याचे ते म्हणाले.

नवीन कार्यकारीणी अध्यक्ष : नरेंद्र कुलकर्णी, संघटन सरचिटणीस – प्रशांत मुथा, सरचिटणीस – वैभव जोशी, उपाध्यक्ष- मंगेश निसळ, अनिल शिंदे, महेश हेडा, राजेंद्र सारडा, गणेश मिसाळ, गणेश कोरडे,विशाल गायकवाड, विनायक नेवसे, अनिल वाघ. चिटणीस – अभिजित चिप्पा, रोहित मुळे, विजय सामलेटी, निळू दिवाणे, शुभम कोटा. व्यापारी आघाडी अध्यक्ष –गोपाल वर्मा, सरचिटणीस – पियुष संचेती. युवा मोर्चा अध्यक्ष – वैभव गुगळे, उपाध्यक्ष – सिद्धार्थ जाधव, सचिव संकेत गुरव, सोनू दातरंगे, भटक्या-विमुक्त आघाडी अध्यक्ष – संदिप ढाकणे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – अलिस सय्यद, चिटणीस – अब्दुल शेख. महिला आघाडी अध्यक्षा – डॉ.ज्योती सैंदाणे, वैद्यकीय आघाडी – डॉ.दर्शन कळमकर, प्रसिद्धी प्रमुख – अभिषेक दायमा.

LEAVE A REPLY

*