सेनेचे नगरसेवक दुल्लम भाजपच्या मांडवात

0

भाजपा शहर जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. झुंजारराव झांजे

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महापालिकेवर 2018 च्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार खासदार दिलीप गांधी यांनी केला आहे. त्याची पायाभरणीही सुरू आहे. आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी ‘वाटाघाटी’ही पूर्ण झाल्या आहेत. त्याची झलक पदोपदी गांधी दाखवित आहेत. सेनेचे नगरसेवक मनोज दुल्लम यांनीही भाजपाच्या मांडवात हजेरी लावत गांधी यांच्या निर्धाराला धार दिली आहे.
भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकांना नियुक्ती पत्र देण्याच्या सोहळ्यात हजेरी लावत दुल्लम यांनी आपली वाटचाल दिशादर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रश्न असून, ते सोडविण्याच्या उद्देशाने भाजपा शहर जिल्हा वैद्यकीय आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून वैद्यकीय क्षेत्रात सुसूत्रता यावी, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, असे खासदार दिलीप गांधी यांनी यावेळी सांगितले. भाजपा शहर जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. झुंजारराव झांजे यांना नियुक्तीचे पत्र खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी श्रीपाद छिंदम, महाराष्ट्र संघटन सरचिटणीस डॉ. अजित फुंदे, विजय मंडलेचा, अ‍ॅड. राहुल रासकर, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते.
भाजपा शहर जिल्हा वैद्यकीय आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्षपदी डॉ. झुंजारराव झांजे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी दूर करण्याचा व सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. खासदार दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी काम करणार असल्याचे झांजे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*