भारनियमनाचे राजकीय फटाके : राष्ट्रवादी नकलाकार

0

अनिल राठोड यांचा आरोप, कळमकर आंदोलनातून गायब कसे?

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरात शिवसेना अन् अनिल भैय्या जे करेल तेच राष्ट्रवादीवाले करत आहेत. आमची नक्कल ते करताहेत. मात्र नक्कल करण्याची अक्कलही त्यांना नाही. राष्ट्रवादीचा बालिश गट आंदोलन करत असताना दादा कळमकर व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ज्येष्ठ नेते कोठेच दिसत नाही असे सांगत सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी एनसीपीच्या आंदोलनाची खिल्ली उडविली.
शहरातील भारनियमनाच्याविरोधात बुधवारी सेना व त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्यासंदर्भात अनिल राठोड यांनी ‘नगर टाइम्स’कडे आपली भूमिका मांडली. अनिल भैय्या जसा वागतो, करतो त्याची कॉफी राष्ट्रवादीवाले करत आहेत. 

शिवसेना जे करते त्याची नक्कल राष्ट्रवादीवाले करत आहेत. मात्र नक्कल करण्याची अक्कलही त्यांना नाही. सेनेच्या पाठीमागे जनमत उभे राहत आहे. जनमताच्या जोरावर शिवसेनेची ताकद वाढली आहे. ही ताकद आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरेल याची भिती राष्ट्रवादीवाल्यांना आहे. जनमत आपल्या बाजुने वळविण्यासाठी बळजबरीने ते नक्कल करून आंदोलन करत आहेत. शिवसेनेच्या आंदोलनानंतर लगेचच आंदोलन करणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

बालिशगट पुढे, ज्येष्ठ गेले कुठे?
राष्ट्रवादी जे काही आंदोलन करते त्यात तेच ते चेहरे आहेत. आंदोलन करणारे बालिश आहेत. लहान मुलांसारखे ते वागत आहेत. दादा कळमकर, अभिषेक कळमकर यांच्यासारखी ज्येष्ठ नेतेमंडळी आंदोलनात कोठेच कशी दिसत नाही? असा सवाल करत अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाची खिल्ली उडविली.

परमार हटाव मोहीम
वीज वितरण कंपनीच्या आंदोलनाप्रसंगी शिवसैनिकांशी झटापटी करणारे कोतवालीचे पोलीस निरीक्षक अभय परमार हटाव मोहीम सेना हाती घेणार आहे. त्यासाठी मोर्चा काढून वरिष्ठांना भेटणार आहे. मदन आढावा यांची फिर्याद घेण्यासाठी मुद्दामहून टाळाटाळ केली जात आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुंडांना सन्मानाची तर राजकारण्यांना गुंडांची वागणूक दिली जात आहे. अधिकार्‍यास बदनामी किंवा जेलमध्ये जावे लागते हा कोतवाली पोलीस ठाण्याचा इतिहास आहे, याची आठवण राठोड यांनी करून दिली.

LEAVE A REPLY

*