Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?

Share

मुंबई | प्रतिनिधी

वरळी मतदार संघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपले प्रतिज्ञापत्रक दाखल केले. प्रथमच ठाकरे घराण्याचा एक व्यक्ती  निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून यानिमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या ‘ठाकरे’ कुटुंबातील सदस्याची संपत्ती जगासमोर आली आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे दिसते आहे. यात १० कोटी ३६ लाख रूपयांच्या बँकेत ठेवी असल्याचे म्हटले आहे. तसेच शेअर्स आणि बाँडच्या रुपात २० लाख ३९ हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

तसेच आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.  त्यांच्याकडे एकूण ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडे इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजार रुपयांची आहे.

  • १० कोटी ३६ लाख रूपयांच्या बँकेत ठेवी
  • शेअर्स आणि बाँडच्या रुपात २० लाख ३९ हजार रुपयांची गुंतवणूक
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू गाडी
  • बीएमडब्ल्यू गाडीची किंमत ही ६ लाख ५० हजार
  • एकूण ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने
  • इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजार रुपयांची
  • आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!