Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : राखणदार बळवंतगडावर शिवराज्यअभिषेक दिन साजरा

Share

इगतपुरी । दि. ६ प्रतिनिधी

शिव राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटाचा राखणदार म्हणुन ओळख असणाऱ्या ” बळवंत ” गडावर पावसाच्या वातावरणात घोटीच्या कळसूबाई मित्र मंडळाने शिवराज्य अभिषेक दिन साजरा केला.

प्रसिध्द उसलेला मात्र सध्या दुर्लक्षित असलेल्या या बळवंत गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीचा अभिषेक करून शिवगर्जना देत शिवराज्य अभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

यानिमित्ताने गडावर विविधप्रकारच्या फळांच्या बिया टाकून पर्यावरण दिनही साजरा करण्यात आला. नाशिक जिल्हा हा एक प्रकारे पुरातण बाजारपेठ आहे.

एकेकाळी मुंबई व डहाणू बंदारातून कसारा घाटातुन नाशिक बाजारपेठेत माल जात असे. तो माल घाटातुन सुरक्षित जावा आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी म्हणुन बळवंत गडाचा वापर होत असे.

काही वेळेला किल्ल्याचे अवशेष नाहीत म्हणून सुद्धा काही किल्ले दुर्लक्षित राहतात. एकीकडे काही ठिकाणी लोक गर्दी करतात आणि एकीकडे काही किल्ल्यांच्या आजूबाजूला पण कोण फिरकत नाही. खूप कमी भटके इथे जाऊन आलेत.

इगतपुरी घाटन देवीच्या अगदी खाली जवळच असलेले विहिगाव येथे असलेल्या अशोका धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे. विहिगावात प्रवेश करण्यापूर्वी डावीकडे ” माळ ” गावाला जाण्यासाठी एक फाटा फुटतो.

हा रस्ता वळणावळणाने वर चढतो. वरती चढल्यावर एक पायवाट डावीकडच्या टेकाडावर जाताना दिसते. हीच पायवाट थेट ” बळवंत ” गडावर जाते. १० मिनिटातच आपण उध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश करतो.

माथ्यावर पोहचल्या-पोहचल्या आपल्या दृष्टीत पडतो तो कसारा घाट आणि कसारा घाटाचे सौंदर्य वाढवणारा रेल्वे ट्रॅकचे बोगदे. त्या बोगद्यातून वळवळत येणारी ट्रेन गडावरून खूपच सुंदर दिसते.

गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत. चारी बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे. गडाच्या मधोमध नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे. ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाकं आहे पण तिथे जाण्यासाठी थोडं पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत.

टाक बऱ्यापैकी मोठं आहे पण यात खूप गाळ साचला आहे. गडाच्या शेवटी एक बुरुज मात्र अजून गडाची राखण करत उभा आहे. आणखी गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत. बाकी गडावरून किल्ल्याचे काही अवशेष नाहीत.

गडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य, खोल दऱ्या पाहण्यासारख्या आहेत. या मोहीमेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगिरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, आत्माराम मते, अशोक हेमके, बाळू आरोटे, सोमनाथ भोर, प्रविण भटाटे, डॉक्टर महेंद्र आडोळे, संतोष म्हसने, शाम आदमाने सर, नितीन भागवत, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, मच्छिन्द्र कोरडे, सागर टोचे, गणेश काळे, गोविंद ढगे आदी गिर्यारोहक सामील झाले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!