Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

प्रतापगडाचा पराक्रम ‘शिवप्रतापगड वाघनख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Share
प्रतापगडाचा पराक्रम 'शिवप्रतापगड वाघनख' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, shivpratap gad marathi movie released soon breaking news

नाशिक | प्रतिनिधी

प्रतापगडाच्या पराक्रमावर आधारित ‘शिवप्रतापगड. वाघनख’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी ही घोषणा केली असून पुढील वर्षी 6 नोव्हेंबर 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते.

शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपानेआलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले होते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेले डॉ. कोल्हे यांनी केलेल्या घोषणेनंतर शिवप्रतापगड चित्रपटाचे वेध शिवप्रेमींना लागले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!