समाजवादी पार्टीत अखेरीत फूट; शिवपाल यादवांचा नवा पक्ष

0

नवी दिल्ली, ता. ५ : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावरच त्यावेळेस सत्ताधारी असलेल्या समाजवादी पार्टीत यादवी माजलेल्या यादवीचे रुपांतर आज अखेरीस पक्षाच्या विभाजनात झाले.

मुलायमसिंह यादव यांचे भाऊ शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत.

खुद्द शिवपाल यादव यांनीच ही माहिती आज दिली. मुलायमसिंहांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राहावा या त्यामागील उद्देश असल्याचेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या धामधुमीतच अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यात वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर सुरवातीला शिवपाल यादव यांनी मुलायमसिंह यांच्यासह पक्षाची बैठक बोलावून अखिलेश यांना निलंबित केले, तर नंतर अखिलेश गटाने पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावत त्यांना अध्यक्षपद बहाल केले होते.

शिवपाल यादवांच्या या कृतीने उत्तर प्रदेशचे राजकारण वेगळ्या वळणावर पोहोचणार आहे.

LEAVE A REPLY

*