Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार ; तोंडाचे डबडे वाजवू नका

Share

मुंबई : राज्यात दुष्काळाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तेत राहून काय करतेय, असा सवाल केला होता. त्याला शिवसेनेने मुखपत्र सामनामधून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेने उठवलेला आवाज आधी समजून घ्यावा, असे म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले आहे. राज्यावर दुष्काळ ही मोठी आपत्ती कोसळली आहे. ही काही श्रेय घेण्याची लढाई नव्हे, असे म्हणत शिवसेनेने भाजपचेही कान टोचले आहेत.

शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते, असे उगाचच तोंडाचे डबडे वाजवत राहणाऱ्या दीड शहाण्यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून शिवसेनेने उठवलेला हा आवाज नीट समजून घेतला पाहिजे. शिवसेना सरकारमध्ये जरूर आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या विषयांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरे कोण पुढे असते?, असा प्रश्न अग्रलेखाच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. यात राज ठाकरे किंवा अन्य नेत्यांचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. पण अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेने त्यांनाच प्रत्युत्तर दिल्याचे दिसते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!