Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेते आज राज्यपालांना भेटणार

Share

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ‘महासेनाआघाडी’ सत्तास्थापनेचा दावा करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्या शनिवारी दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितल्याची माहिती आहे. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तिन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल.
या भेटीत शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करणार की अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना मदतीबाबत मागणी करणार, हे समजलेलं नाही. भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच सकाळी याबाबत राज्यपालांची भेट घेतली होती.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल पहिली समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान सामायिक कार्यक्रमाचा मसुदा तयार केल्याचं बोललं जातं.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच असेल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली.

पाटलांच्या दाव्यानं प्रचंड खळबळ
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडीबाबत जोरदार चर्चा आणि बैठका सुरु असताना भाजपला मात्र पुन्हा सत्तेचे डोहाळे लागताना दिसत आहेत. भाजपशिवाय सत्ता स्थापन होणे शक्य नसल्याचे आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने घेतलेल्या सर्व आमदारांच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपचे एकूण संख्याबळ 105 आहे. त्यात 14 अपक्ष सहयोगी झाल्यामुळे एकूण 119 आमदार भाजपकडे आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!