Thursday, May 2, 2024
Homeराजकीय“जनाब देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

“जनाब देवेंद्रजी, चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?”

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आह, असं फडणवीस म्हणाले. आता शिवसेना (Shivsena) प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करत आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा सवाल केला आहे.

‘जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,’ अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

MIM सोबतच्या आघाडीबाबत शिवसेना काय करते याकडे आमचं लक्ष असेल. निवडणुकीत पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये गोंधळ दिसतो. बी टीम दिसते, सी टीम दिसते. त्यामुळे हरल्यावर अनेक गोष्टी बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेनेनं (shivsena) याआधी एमआयएमवर टीका केली आहे. ते सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. शिवसेनेनं आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. आणि अजानचीही स्पर्धा सुरू आहे. त्याचाच हा परिणाम असावा’असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या