तापकीरे यांचा सेनेला बायबाय

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – निष्ठेने पक्षाचे काम करत असताना निर्णय प्रक्रियेत घेतले जात नसल्याचा आरोप करत दत्तात्रय लहानू तापकिरे यांनी शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. तापकिरे हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात आले. 2013 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांच्यातील पक्ष संघटन पाहून शिवसेनेने त्यांना उपजिल्हाप्रमुख पदाची संधी दिली. गत 4 वर्षापासून ते उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत. तापकिरे यांच्या अचानक राजीनामा देण्यामागे सेनेत एकाधिकारशाही असल्याच्या वृत्ताला बळकटी मिळाली आहे.
यासंदर्भात तापकिरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राजीनामा दिलाय हे खरं आहे. मात्र त्यासंदर्भात आज स्पष्ट बोलणार नाही. पुढची भूमिका काय असे विचारले असता त्यांनी वेळ आली की जाहीर करेन. आज सेनेपासून बाजुला झालो असे सांगत राजकारणापासून दूर जाणार नाही असेही स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*