Saturday, April 27, 2024
Homeनगरदोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा व तेलंगशी या ठिकाणी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश उर्फ बाळू श्रावण तुपे रा. बीड व प्रणिता गंगाधर ढाळे रा. तेलंगशी अशी दोन्ही पाण्यात बुडालेल्या मृतांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पहिल्या घटनेत मृत प्रकाश उर्फ बाळू श्रावण तुपे वय 30 रा. बीड हा एक महिन्यापासून शिऊर फाटा येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करत होता. गेल्या 7 डिसेंबर पासून तो बेपत्ता होता.

- Advertisement -

यानंतर चार दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह शिऊर फाटा येथील हॉटेलच्या मागील विहिरीमध्ये पाण्यावर तरंगताना अढळून आला. घटनेची माहिती मिळताच सपोनि अवतारसिंग चव्हाण व पो. ना. अजय साठे यांनी भेट दिली व शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयत दाखल केला.

पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्या आईवडिलांना दिल्यानंतर त्याचे नातेवाईक रुग्णालयत दाखल झाले. मृत प्रकाश उर्फ बाळू श्रावण तुपेे हा एक महिन्यापूर्वी घरात भांडणे झाली आसल्याने तो जामखेड येथील एका हॉटेलात वेटरचे काम करण्यासाठी आला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांना संशय असल्याने पोलिसांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला असून तपासणीसाठी तो पुढे पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी हॉटेल मालक विठ्ठल ज्ञानदेव देवकाते यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना ही तालुक्यातील तेलंगशी या ठिकाणी घडली. शुक्रवार 13 डिसेंबर रोजी रात्री तेलंगशी येथील अर्जुन बाबु जावळे यांच्या शेतातील विहिरीत कु. प्रणिता गंगाधर ढाळे वय 17 रा तेलंगशी या कॉलेज तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रणिता ही इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती.

दुपारी शेळ्या चारण्यासाठी ती शेतात गेली होती. मात्र विहिरीत अचानक पडल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी ती घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध केली. विहिरीजवळ तिच्या चपला आढळून आल्याने ती पाण्यात बुडाली असल्याचे लक्षात आले. यानंतर मृताचे चुलते मोहन नरहरी ढाळे यांना ही घटना समजताच त्यांनी सदरचा मृतदेह विहिरी बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयत दाखल केला.

या प्रकरणी मोहन नरहरी ढाळे यांनी दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दोन्ही घडलेल्या वेगवेगळ्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना अजय साठे व पो हे कॉ नवनाथ भिताडे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या