Friday, May 3, 2024
Homeनाशिकशिरवाडे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

शिरवाडे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

शिरवाडे वाकद । वार्ताहर Shirvade

शिरवाडे परिसरात अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक तरूण दारूच्या Alcohol आहारी गेले आहेत. तसेच मद्यपींमुळे गावाची शांतता भंग पावली असून गावात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे गावातील अवैध धंदे Illegal trades त्वरीत बंद करण्याची मागणी महिलांनी विशेष महिला ग्रामसभेत Gramsabha of Shirvade केल्याने ग्रामपंचायतीने अवैध धंदे बंद चा एकमुखी ठराव केला असून 26 जानेवारी पर्यंत अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांंनी दिला आहे.

- Advertisement -

शिरवाडे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे गावातील तरुण मुले दारूच्या आहारी गेली असून अनेक तरुणांचा अतिमद्यसेवनामुळे मृत्यू देखील झाला आहे. तसेच मद्यपींचा गावात संचार वाढल्याने गावची शांतता धोक्यात आली असून मद्यपींमुळे त्यांचे कुटुंबात भांंडणे देखील आता नित्याची बनली आहेत. तसेच गावात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

शिरवाडे परिसरात जवळपास 30 विद्युत पंप, मोटार स्टार्टर, स्प्रिंकल, केबल, लोखंडी साहित्य चोरी गेले आहे. हे कमी म्हणून की काय या परिसरात अवैध मटका अड्डा तयार झाल्याने गावातील नागरिकांची मोठी आर्थिक हानी होत आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य महिलांनी सरपंच, ग्रामसेवक यांना निवेदन देऊन गावातील अवैध धंदे बंद करावे अशी मागणी केली. त्या अनुषंगाने सरपंच डॉ.श्रीकांत आवारे यांनी विशेष ग्रामसभा बोलावली.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माणिक आवारे होते. ग्रामसभेने प्रचंड प्रतिसाद देत गावात दारूबंदी व्हावी असा एकमुखी ठराव मंजूर केला. प्रजासत्ताक दिनापर्यंत दारूबंदी न झाल्यास महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. दारूबंदीसाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे पो.कॉ. एल.के. धोक्रट, पो.कॉ.संदीप शिंदे, पानसरे यांनी ग्रामसभेला उपस्थिती दर्शवून अवैध धंद्यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामसभेत ग्रामरक्षक दल नविन सदस्यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली असून त्यांचा अवैध धंद्यांवर वचक राहणार आहे. ग्रामसभेस अशोक आवारे, विजय आवारे, पो.पा. रामनाथ तनपुरे, तंटामुक्त कमेटी अध्यक्ष राजेंद्र आवारे, संदीप आवारे, निशिकांत चिताळकर, अशोक चिताळकर, ग्रामसेवक सुनील शिंदे, शिवाजी आवारे, उपसरपंच गयाबाई निकम, अमोल चिताळकर, मधूकर ठोंबरे आदींसह ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक सुनील शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पोलिसांची सर्वतोपरी मदत

लासलगाव पोलीस स्टेशनने अवैध धंद्यांसंदर्भात वेळोवेळी कडक कार्यवाही केली आहे. मात्र काही छुप्या अवैध धंद्यांबाबत शिरवाडे ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा स्तुत्य उपक्रम असून त्यांना याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनकडून सर्वोतोपरी मदत राहील.

राहूल वाघ, स.पो.नि. (लासलगाव पोलीस ठाणे)

- Advertisment -

ताज्या बातम्या