आहेर ‘शिर्डी’ चे उपकार्यकारी अधिकारी : 2 वर्षे मुदतवाढ

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहात्याचे तहसीलदार संदीप आहेर यांच्या साईबाबा संस्थानच्या उपकार्यकारी अधिकारी पदावरील प्रतिनियुक्तीला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
1 जून 2016 च्या आदेशान्वये तहसीलदार संदीप आहेर यांची साईबाबा संस्थानच्या उपकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीची मुदत 31 मे 2017 रोजी संपुष्टात आलेली आहे. साईबाबा यांच्या समाधीला 2018  मध्ये 100 वर्षे पूर्ण असल्याने संस्थानमार्फत शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
त्याच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणार्‍या अधिकार्‍यांच्या सेवेची आवश्यकता असल्याने आहेर यांना मुदतवाढ देण्याची विनंती कार्यकारी अधिकार्‍यांनी केली होती. त्याअनुषंगाने शासनाने आहेर यांच्या उपकार्यकारी अधिकारी पदावरील प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्तीला 1 जून 2017 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*