साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार : दिवाळी बोनससाठी मुख्यंत्र्यांचा हिरवा कंदील

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याने संस्थानच्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण बघण्यास मिळाले आहे.
विधी व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था प्रत्येक वर्षी रामनवमी, गुरुपौर्णीमा, दसरा असे अनेक उत्सव मोठ्या उत्साहाने धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. या कालावधीत जगभरातून येणार्‍या साईभक्तांना दिवसरात्र सुखसोयी पुरविण्यासाठी कार्यालयीन कामकाजापेक्षा अधिक वेळ आपली सेवा संस्थानला पुरवित असतात.
याचा सारासार विचार करून साईबाबा संस्थान सन 1977 पासून कर्मचार्‍यांना दीपावली निमित्त सानुग्रह अनुदान देत आहेत. याही वर्षी कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यासाठी साईबाबा संस्थानने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.
त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवीत तात्काळ मंजुरी दिली. यावेळी संस्थानचे माजी विश्‍वस्त सचिन तांबे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दिवाळी बोनस जाहीर केल्याने संस्थान कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. यामध्ये 1 ऑक्टोबर 2016 पासून ते 30 सप्टेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत कर्मचार्‍यांच्या एकूण वार्षिक वेतनाच्या 8.33 टक्के इतके अनुदान मिळणार असल्याचे सचिन तांबे यांनी सांगितले..

LEAVE A REPLY

*