साईरथासाठी संस्थानने खरेदी केली 28 लाखांची वातानुकुलीत बस

0

शिर्डी (शहर प्रतिनिधी)– साई समाधी शताब्दी सोहळ्या निमित्त साईबाबांच्या पादुका 13 ऑक्टोबर रोजी गोवा राज्यातून भारत भ्रमणासाठी निघणार आहेत.त्यासाठी साईसंस्थानच्यावतीने 28 लाख रुपये किंमतीची भारत बेंझ कंपनीची वातानुकुलीत बस खरेदी केली. या बसचे बुधवारी सकाळी शिर्डीत आगमन झाले यावेळी संस्थानच्यावतीने विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगीताताई शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, डॉ एकनाथ गोंदकर, अभय शेळके, नितीन कोते, पाणीपुरवठा सभापती सुजीत गोंदकर, पतिंगराव शेळके, कमलाकर कोते, ज्ञानेशवर गोंदकर, सुधाकर शिंदे, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, अ‍ॅड,आनिल शेजवळ, प्रमोद गोंदकर, बाबासाहेब कोते,

निलेश कोते, राजेंद्र शिंदे, रमेश गोंदकर, जमादारभाई ईनामदार, सचिन चौघुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिर्डी ग्रामस्थांच्या सुचनेनुसार साईबाबांचा पादुका साईसंस्थानने विविध राज्यांत दर्शनासाठी घेऊन जाव्यात व त्यासाठी साई रथ तयार करावा याप्रकारची सूचना साईबाबा संस्थानला यापूर्वी केली होती.

त्यासाठी देशातील उत्कृष्ट कार डिझायनर दिलीप छाबरा यांचे बनवलेले साईरथाचे डिझाईन संस्थानच्या मिटींगमध्ये ग्रामस्थांनी मांडले होते. मात्र, संस्थानने त्याला विरोध दर्शविला आणी एक बस खरेदी करून तोच साई रथ असल्याचे ग्रामस्थांना भासविण्यात आल्यामुळे साईबाबांच्या पादुका रथाकडे पाहण्याचा भक्तांचा दृष्टीकोन साधारण राहणार असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*