लाडू प्रसाद बनविणार्‍या कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

0

लाडू प्रसाद मिळत नसल्याने साईभक्तांमधुन संताप : पगार थकविल्याने  कर्मचार्‍यांचा ठिय्या

शिर्डी(प्रतिनिधी) – गत दोन महिन्यापासून पगार न मिळाल्यने लाडु बनविणार्‍या कर्मचार्‍यांनी लाडू प्रसाद बनविणे बंद केले आहे. कर्मचार्‍यांनी कामबंद ठेवुन संस्थान व ठेकेदार कंपनीच्या विरोधात कामबंद आंदोलन सुरू केल्याने संस्थानने लाडु विक्री बंद केली आहे. हजारो साईभक्तांना साईदर्शनानंतर लाडू प्रसादाविनाच घरी परतावे लागत आहे.यामुळे साईभक्तामधुन संताप व्यक्त होत आहे.
याबाबतचे वृत्त असे, नाशिक येथिल कंपनीने लाडू तयार करून त्याची पॅकींग करण्याचा ठेका घेतला आहे. यासाठी शेकडो कर्मचारी रात्रदिवस येथे राबत आहे. मात्र गेल्या दोन महिण्यांपासून कंपनीने या कर्मचार्‍यांना त्यांचे वेतन आदा केले नाही. वेळोवेळी मागणी करूनही ठेकेदाराकडून आश्‍वासनाशिवाय काहीच पदरात पडत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले. रोजीरोटी या पगारावरच आवलंबुन असल्याने कर्मचार्‍यांचा संयम सुटला.
त्यांनी बुधवारी काम बंद करण्याचा निर्णय घेवुन ठेकेदाराच्या विरोधात प्रसादाययासोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. साईबाबांच्या दरबारी आलेला प्रत्येक भाविक मायदेशी जातांना लाडूचे एक पॅकेट तरी घेवूनच जातो, साजूक तुपात बनवलेल्या बुंदीचे हे लाडू म्हणजे सांईबाबांचा प्रसाद आहे.
दिवसे दिवस या प्रसादाची मागणी वाढत असून यासाठी साईबाबा संस्थान मध्ये स्वतंत्र विभाग आहे, बुंदी तयार करुन तिचे लाडू बनवणे तसेच त्याचे पॅकींग करण्याचा काम संस्थान ठेकेदाराकडून करून घेते तर विक्रीचे काम संस्थानच्या माध्यमातून चालते, हा ठेका नासिक येथिल यशोधरा महिला औध्योगिक संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थे मार्फत याठिकाणी लाडू बनवणे काम चालू असून शेकडो पुरूष व महिला कर्मचारी येथे काम करतात.
गेल्या दोन महिन्यापासून ठेकेदारांने या कर्मचार्‍यांचा पगार दिला नसल्याने कर्मचारी हैरान झाले आहेत. वेळोवेळी संस्थेशी संपर्क साधून ही फक्त वायदा केला जातो, मात्र प्रत्यक्षात पगार दिला जात नसल्याने अनेक अडचणीला सामोरे जाव लागत असल्याच्या व्यथा कर्मचारी मांडत आहे. मात्र ठेकेदाराने चालढकल केल्याने कर्मचार्‍यांनील आक्रमक होवुन काम बंद आंदोलन सुरू केले.
प्रसादालयात मोठ्या प्रमाणात बूंदी तयार असून तिचे पॅकींग न झाल्याने सध्या लाडू कौऊंटर वर विक्रीसाठी लाडू पॅकेट उपलू्ध नसल्याने साईभक्तांना प्रसादाविनाच परतावे लागत आहे. लाडू प्रसाद मिळेल या अपेक्षेने अनेक भक्त ताटकळत उभे पाहून लाडू सुरु होण्याची प्रतिक्षा करत आहे. हातावर काम करुन पोट भरणार्‍या कर्मचार्‍यांना वेठीस धरणार्‍या संस्थेवर संस्थान काय कारवाई करणार याकडे साईभक्तांचे लक्ष लागुन आहे.

LEAVE A REPLY

*