Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डीकरांच्या इशार्‍यानंतर सीईओ भाग्यश्री बानायत यांची दिलगिरी

शिर्डीकरांच्या इशार्‍यानंतर सीईओ भाग्यश्री बानायत यांची दिलगिरी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी जाऊन साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत प्रश्नांची सरबत्ती केली. झालेल्या प्रकाराबद्दल माफ़ी मागावी अन्यथा उद्या शिर्डीकर गाव बंद ठेवून निषेध नोंदवतील, असा इशारा दिल्यानंतर भाग्यश्री बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त विधानावरून संतप्त झालेल्या शिर्डीतील ग्रामस्थ व साईभक्तांमधील नाराजीवर पडदा पडला .

- Advertisement -

साईबाबांनी संपूर्ण विश्वाला सबका मालिक एक हा एकात्मतेचा मंत्र दिला. आयुष्यभर फ़क़ीराचे आयुष्य जगलेल्या साईबाबांच्या धर्माच्या उल्लेखावरून नवा वाद निर्माण झाला. साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केला होता. त्याचा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.या उल्लेखामुळे देश विदेशातील करोड़ो भाविकांच्या श्रध्देला ठेस पोहचवणारा असल्याची भावना व्यक्त होत असून साईबाबांच्या धर्मनिरपेक्षतेलाच नख लावण्याचा प्रयत्न असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शिर्डीसह भाविकांमध्ये उमटल्या.

दरम्यान काल सोमवारी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी जावून सीईओ बानायत यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत प्रश्नांची सरबत्ती केली. झालेल्या प्रकाराबद्दल माफ़ी मागावी अन्यथा उद्या शिर्डीकर गाव बंद ठेवून निषेध नोंदवतील असा इशारा दिल्यानंतर सीईओ भाग्यश्री बानायत यांनी आपण बोललेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त करत मला ज्यांनी माहीती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त विधानावरून संतप्त झालेल्या शिर्डीतील ग्रामस्थ व साईभक्तांमधील नाराजीवर पडदा पडला .

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या सुरू असलेल्या बैठकीच्या ठिकाणी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थ पोहचल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते,शिवसेनेचे कमलाकर कोते ,नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,माजी विश्वस्त सचिन ताँबे यांनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांना धारेवर धरत साईबाबांच्या जातीचे उल्लेख केल्याबद्दल सीईओ बानायत यांचा निषेध करत कार्यकारी अधिकारी बानायत यांनी माफी मागावी अन्यथा शिर्डीकर गाव बंद आंदोलन करतील असा इशारा दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या