Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना एकत्रित मासिक वेतन मंजूर

Share
शिर्डी संस्थानच्या 588 कंत्राटी कामगारांना कायम नियुक्त्या, Latest News Sai Trust Contrac Workers Appointments Shirdi

635 जणांना लाभ उर्वरित कर्मचार्‍यांवर टांगती तलवार

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डीतील श्रीसाईबाबा संस्थानच्या आस्थापनेवरील कंत्राटी कर्मचार्‍यांना एकत्रित मासिक वेतन मंजूर करण्याचा निर्णय विधि व न्याय विभागाने घेतला आहे. याचा लाभ 635 कर्मचार्‍यांना होणार आहे. एकीकडे या निर्णयाचे कर्मचार्‍यांनी स्वागत केले असले तरी दुसरीकडे उर्वरित कंत्राटी कर्मचार्‍यांवर टांगती तलवार असल्याने कही ख़ुशी कही गम असे चित्र बघायला मिळाले आहे.

संस्थानच्या सन 1981-2000 पर्यंत कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या अकुशल दर्जाच्या वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांना दरमहा 4500 व कुशल कर्मचार्‍यांना दरमहा 5500 इतके एकत्रितपणे देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 2009 च्या शासन निर्णयानुसार शिर्डी आस्थापनेवरील पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. संस्थानने 2001-2004 या कालावधीत कंत्राटदारामार्फत कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना दरमहा 5913 व अकुशल कर्मचार्‍यांना दरमहा 5113 इतक्या वेतनावर नियुक्ती देऊन त्यांच्या सेवा नियमित करण्यास शासनाने मान्यता द्यावी अशी विनंती केलेली आहे. संस्थानच्या अधिनियम 2004 मधील कलम 13 (4) मधील परंतुकानुसार ज्या अधिकार्‍याला किंवा कर्मचार्‍याला दरमहा 2000 हून अधिक वेतन देण्यात येत असेल किंवा द्यावयाचे असेल अशा कोणत्याही अधिकार्‍याची किंवा कर्मचार्‍याची नेमणूक समितीकडून, असे पद शासनाने मान्य केलेल्या कर्मचारी आकृतीबंधात मंजूर करण्यात येईपर्यंत केली जाणार नाही अशी तरतूद आहे.

कंत्राटदारामार्फत कंत्राटी पध्दतीने 2001 ते 2004 या कालावधीत निर्णयान्वये संस्थानसाठी मंजूर केलेल्या कंत्राटी पदावर घेण्यास मान्यता देऊन कुशल कर्मचार्‍यांना दरमहा 5913 व अकुशल कर्मचार्‍याला दरमहा 5113 इतके एकत्रित मासिक वेतन अथवा किमान वेतन कायद्यानुसार अनुज्ञेय होणारे वेतन यापैकी जे जास्त असेल ते वेतन देण्यास मंजुरी देण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार यापैकी जे जास्त वेतन असेल ते वेतन देण्यास मंजुरी देऊन शासनाच्या शासन निर्णयान्वये मंजूर केलेल्या आकृतीबंधातील कंत्राटी पदावर नियुक्ती देण्यास साईबाबा संस्थानला अटीस अधीन राहून व्यवस्थापन निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.यापुढे सदर कर्मचारी आता ठेकेदाराच्या यादीतून वगळण्यात येणार असून ते साईबाबा संस्थांनकडून काम करतील आणि निर्णयानुसार वेतन प्राप्त करतील. सन 2006 ला 1052 कर्मचार्‍यांना अशाच पद्धतीने निर्णय करून सेवेत कायम करण्यात आले आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी अधिनियम 2004 मधील कलम 13 (4) व त्याखालील परंतुकास अनुसरून तसेच पुढील अटीस अधीन राहून साईबाबा संस्थानच्या निधीतून अदा करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने कायम करण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल उचलले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचारीच..
एकत्रित मासिक वेतन मंजूर करण्यात येत असलेतरी, संबंधित कर्मचार्‍याचा संस्थानच्या नोकरीतील दर्जा हा कंत्राटी कर्मचारी म्हणून राहिल. त्यास साईबाबा संस्थानकडे कायमस्वरूपी नोकरी मागण्याचा हक्क राहणार नाही.त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!