शिर्डीत 25 तोळ्यांंसह 25 हजार रूपये लांबवले

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डीत लग्नसमारंभासाठी इंदोर येथुन आलेल्या जैन कुटुंबाचे 25 तोळे सोन्याचे दागीने व 25 हजार रोख रक्कमेसह असा एकुण 6 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील इंदौर येथील संजय जैन व त्यांची पत्नी वर्षा जैन हे दि.20 नोव्हेंबर रोजी शिर्डीतील एक हजार रूमजवळील लग्नसमारंभासाठी आले होते. त्याचदिवशी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास लग्नात नाचगाण्याचा कार्यक्रम चालू असतांना वर्षा जैन यांच्याजवळील पर्समध्ये पंचवीस हजार रूपये रोख व पंचवीस तोळे सोन्याचे दागिने होते़.
यात सोन्याचे तीन नेकलेस, कानातील सहा कर्णफुले, मंगळसुत्र, सोन्याच्या बांगड्या, नाकातील पाच नथ, एक ब्रासलेट, दोन चेन, घड्याळ, चांदीची शिक्का व आधारकार्ड होते असे फिर्यादीत म्हटले असुन या सर्व ऐवजाची किंमत साडे सहा लाख रूपये आहे. फिर्यादी वर्षा संजय जैन यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गु र नं 143/17, भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अनेकजण साईनगरीतील विविध हॉटेल किंवा लॉन्सला विवाह सोहळ्याचे आयोजन करत असतात.
मात्र गेल्या एक दोन वर्षात काही विवाह सोहळ्यातुन महिलांच्या सोने ठेवलेल्या पर्स चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटे लहान मुलांच्या मदतीने या चोर्‍या करीत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. मात्र विवाहस्थळी नातेवाईंकासारखे वावरणार्‍या व्यक्तींना किंवा लहान मुलांना हटवणे सुरक्षा रक्षकांना अवघड असते. चोरी झाल्यानंतर तपासासाठी केवळ सीसीटिव्ही फुटेजवर अवलंबुन राहावे लागते. आजच्या घटनेतही लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणावर संशय असुन पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप कहाळे सीसीटिव्ही फुटेज व अन्य मार्गाने आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*