शिर्डी जवळील ११ एकर जागेत साकारणार छत्रपती शिवरायांची रांगोळी

0
शिवरायांच्या विचारांनी प्रेरीत कोपरगावातील विद्यार्थिनीचा विश्वविक्रम
अहमदनगर – शिर्डीच्या सावलीविहिर फाट्याजवळील ११ एकर जागेत जागतिक विश्व विक्रमाची रांगोळी काढण्याचा निश्चय कोपरगावच्या सौंदर्या संदीप बनसोड हिने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ती हा विश्वविक्रम करणार आहे. त्यासाठी सौंदर्याने तयारी सुरू केली आहे. सौंदर्याला ही विश्व विक्रमाची रांगोळी काढण्यासाठी अंदाजे २५० टन अर्थात २५ लाख रुपयांची रांगोळी लागणार आहे. शिवरायांच्या विचारांनी प्रेरीत होवून सौंदर्याने महाराजांची भव्यदिव्य रांगोळीचा काढण्याचा निर्धार केला.

सौंदर्या हि ७ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. कुलदैवत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या सौंदर्या हिने शिवजयंतीच्या दिनी हि भव्यदिव्य रांगोळी साकारणार आहे. या रांगोळीसाठी सौंदर्याला जवळपास 20 दिवस अथक परीश्रम करावे लागणार आहे. दरम्यान; २६ जानेवारीपासून या कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला ती विश्वविक्रमाला गवसनी घालणार आहे. एवढ्या मोठ्या जागेत शिवरायांचे रांगोळी चित्र रेखाटणारी १२ वर्षाची सौंदर्याच्या नावे हा विश्वविक्रमच नोंदविला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*