शताब्दी सोहळ्यानिमीत्त साईंच्या पादुका दर्शनासाठी देशविदेशात

0

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबांच्या समाधीला 18 ऑक्टोबर 2018 या दिवशी 100 वर्ष पूर्ण होत आहेत.

या घटनेचा हा शतकीटप्पा संस्मरणीय पध्दतीने साजरा होण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2018 हा कालावधी साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने निश्‍चित केले आहे.

या महत्वपूर्ण कालावधीचे गांभीर्य जाणून उत्तमोत्तम व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संस्था न व्यवस्थापनाने ठरविले आहे.

शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साईबाबा संस्थानच्यावतीने साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातील विविध शहरांमध्ये व जगातील 25 देशांमध्ये तेथील साई मंदिरांमार्फत करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*