साईशताब्दी सोहळ्याचे कलावंतांना निमंत्रण

0

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबांच्या समाधीस दि.18 ऑक्टोबर 2018 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत.

यानिमीत्ताने विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले असून कलावंतानी या कार्यक्रमात भाग घ्यावा यासाठी साई संस्थानने त्यांना निमंत्रित केले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी दिली.

हा शतकी टप्पा संस्मरणीय पध्दतीने साजरा होण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर 2017 ते दि. 18 ऑक्टोबर 2018 हा कालावधी साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने निश्‍चित केले आहे. या कालावधीत दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने ठरविले आहे.शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थानतर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून देश विदेशातील नामवंत तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचे कार्यक्रम शिर्डी येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

शताब्दी वर्षानिमित्त जे नामवंत कलाकार शिर्डी येथे विनामूल्य कार्यक्रम करू इच्छित आहेत, त्यांनी उपजिल्हाधिकारी व शताब्दी कक्ष तसेच साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*