दत्तजयंती उत्सवाला साईंच्या झोळीत 3 कोटी 61 लाखाचं दान

0

दानात 13 परकीय देशांच्या चलनाचा समावेश

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईसमाधी शताब्दी सोहळ्याला सुरवात झाली असुन रविवारी संपन्न झालेल्या तिन दिवसीय दत्तजयंती उत्सवात बाबांच्या झोळीत 3 कोटी 61 लाख 39 हजार रूपयांचे भरभरून दान मिळाल्याचे साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
साईरबाबांची महती दिवसेंदिवस वाढत असतांना त्यांच्या दानातही विक्रमी वाढ होतांना दिसत आहे. गेल्या तीन दिवसाच्या दत्तजयंती उत्सव काळात मोजदाद करण्यात आलेल्या दानात दक्षिणा पेटीच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 24 लाख 85 हजार रूपये इतकी रोख स्वरूपात दान प्राप्त झाले असून 13 देशांच्या परकिय चलनाचा समावेश असल्याचे सांगीतले. देणगी कक्षातून सुमारे 58 लाख 47 हजार रूपयाचे साई संस्थानला रोख दान मिळाले आहे.
त्याचप्रमाणे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून 83 लाख 90 हजार 334 रूपयांचे तर ऑनलाईन दानाच्या माध्यमातून सुमारे 18 लाख 67 हजार 756 रूपये दान प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे धनादेशाव्दारे सुमारे 28 लाख 36 हजार 105 रूपये दान प्राप्त झाले असे 3 कोटी 61 लाख 39 हजाराचे दान मिळाले आहे.
दक्षिणापेटी व देणगी कांडटरच्या माध्यमातून सोन्याच्या रूपाने 247.75 ग्रॅम वजनाचे 7 लाख 48 हजार 205 रूपयांचे सोने प्राप्त झाले आहे. तर चांदीच्या रूपाने 4 किलो 108 ग्रंॅम वजनाची सुमारे 1 लाख 59 हजार रूपयांची चांदी प्राप्त झाली आहे. तसेच परकिय चलनाच्या माध्यमातून देखील साईंच्या झोळीत दान आहे. यामध्ये एकुण 13 देशाचे दान आले आहे.
त्या माध्यमातून 3 लाख 83 हजाराचे दान साई संस्थानास प्राप्त झाले आहे. त्यामध्ये अमेरीका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रीलिया, कॅनडा, मलेशिया, कुवेत, ओमाद, सौदी अरेबिया, लंडन आदींसह देशाचे चलन आले आहे, असे सर्व मिळून 3 कोटी 61 लाख 39 हजाराचे भरभरून दान बाबांच्या झोळीत आले आहे.
या उत्सवा दरम्यान महत्वाच्या व्यक्तींना साई संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाकडून वितरीत करण्यात आलेल्या पासद्वारे 34 लाख 24 हजार 600 रूपये मिळाले आहे. तर या उत्सावासाठी तिन दिवसात सुमारे 1 लाख 75 हजार भाविकांनी प्रसादालयाचा लाभ घेतल्याचे समजले.

LEAVE A REPLY

*