Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डी साई संस्थानमधील नियुक्त्यांवरून अजित पवार समर्थकांत नाराजी

शिर्डी साई संस्थानमधील नियुक्त्यांवरून अजित पवार समर्थकांत नाराजी

शिर्डी l शहर प्रतिनिधी l Shirdi

जगाचे लक्ष लागलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर (Saibaba Sansthan Board of Trustees Shirdi) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समर्थकांना विश्वस्तपदासाठी डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अजित पवार समर्थकांमध्ये…

- Advertisement -

मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरल्याचे वृत्त हाती आले असून संभाव्य विश्वस्त मंडळाच्या यादीतील काही लोकांच्या तांत्रिक कारणास्तव फेरबदल होण्याची शक्यता असल्याने याविषयी उपमुख्यमंत्री पवार समर्थकांची नाराजी दुर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

‘विमानातून आणलेले रेमडेसीवीर वाटले कोणाला?’

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेबाबत कालावधी निश्चित करून दिल्याने या नुतन विश्वस्त मंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार नवीन विश्वस्तांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक डावलले गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महामंडळांच्या नियुक्त्या मध्ये उपमुख्यमंत्री अजित अजित पवार (Ajit Pawar) यांचा शब्द अंतिम मानला जातो, मात्र शिर्डी संस्थान त्यास अपवाद ठरले आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना जास्तीत जास्त प्रमाणात विश्वस्त मंडळात प्राधान्य मिळाले तर शिर्डीसह परिसराचा विकासाला गती प्राप्त होईल. स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी ग्रामस्थांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिर्डी संस्थानची संभाव्य यादी सोशल मीडियाच्या व इतर माध्यमांच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाली असून उपमुख्यमंत्री यांची जवळची अनेक नावे डावलले गेल्याने त्यांचे समर्थकांंमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे. यामध्ये सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Sinnar MLA Manikrao Kokate) हे अजित पवार यांच्या जवळचे समजले जातात. २०१९ ला त्यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. ते साईबाबा संस्थान विश्वस्त पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांचे नाव डावलले गेले. त्यांच्या जागी नाशिकचे माजी आमदार जयंत जाधव (Former MLA Jayant Jadhav) यांची वर्णी लागली. अजित पवार यांचे मामेभाऊ अजित कदम (Ajit Kadam) यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत होते मात्र त्यांचे नाव डावलले गेल्याने तेे देेेखील संतप्त झाले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांचे विश्वासू असणारे त्याचप्रमाणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे संग्राम कोते पाटील (Sangram Kote Patil) हे उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. मात्र राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने ते शक्य नसल्याचे कारण त्यांना पक्षाकडून सांगण्यात आले. पक्ष त्यांना विश्वस्तपद द्यायला पक्ष तयार होता मात्र आपण कुठल्याही पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतांंना त्यांनी भरीव स्वरूपाचे काम महाराष्ट्रामध्ये उभे केले होते. त्याची नोंद वेळो-वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली होती.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी देखील नगरमधील एक नाव सुचवले होते. शिरूरचे आ. अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी देखील एक नाव सुचवले होते ते देखील डावलले गेल्याने अजित पवार यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या