Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईनगरीत लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी

साईनगरीत लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी

निमित्त नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे !

शिर्डी ( शहर प्रतिनिधी) – नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली असून भाविकांच्या सुरक्षेसाठी संस्थान प्रशासनाने गंभीर पावले उचलली असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मळेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान नाताळ उत्सव तसेच सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई चरणी प्रार्थना करण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत दाखल झाली आहे. यंदा राज्यात सर्वत्र चांगले पर्जन्यमान झाले असल्याने बळीराजा व सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी नाताळच्या सुट्टीत लाखो साईभक्त येत असतात. यावर्षी मात्र दहा दिवस अगोदर शिर्डीत साई भक्तांनी गर्दी केल्याचे चित्र शनिवारी रात्रीपासून बघायला मिळाले.

दरम्यान शनिवारी अचानक शिर्डीत गर्दी झाल्याने रविवारी संस्थान प्रशासनाची दमछाक झाली होती. रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले होते तर साई प्रसादालयात शनिवारी 64 हजार तर रविवारी सायंकाळपर्यंत पन्नास हजारांहून जास्त भाविकांनी लाभ घेतला. दरम्यान सशुल्क दर्शन पास व्यवस्था गर्दी झाल्याने काही काळ बंद ठेवण्यात आली होती, मात्र कालांतराने ती पुन्हा चालू केली. रविवारी सायंकाळपासून मंदिर परिसरातील नंदी गेट बंद ठेवण्यात आले होते.

रविवारी सकाळपासूनच साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर स्वतः लक्ष घालून प्रत्येक ठिकाणचा बारकाईने आढावा घेत होते. संस्थानच्यावतीने सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना दर्शन रांगेत चहा बिस्किटे तसेच 25 हजार भाविकांना संस्थानच्यावतीने निवासाची उपाययोजना करण्यात आली असून संस्थांच्या मोकळ्या जागेतही टेन्ट टाकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीत भाविकांची पाकीटमारी होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करून खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. अचानक गर्दी वाढल्याने शिर्डीतील बाजारपेठ दहा दिवस अगोदरच फुलून गेल्याचे चित्र बघायला मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या