साईबाबांच्या लेंडी बागेला साई संस्थांकडून टाळे

0

बागेतील वृक्षतोडीमुळे सौंदर्य हरपले

शिर्डी (शहर प्रतिनिधी)– साई मंदिर परिसरात असलेल्या लेंडी बागेत साईभक्त, आबालवृद्ध येऊन साईंचे नामस्मरण करीत असत. मात्र साई समाधी शताब्दीच्या पूर्वसंध्येलाच लेंडी बागेला साई संस्थान प्रशासनाने टाळे ठोकल्याने साईभक्तांच्या भावनेला तीव्र धक्का लागला आहे. या बागेतील जुने वृक्ष तोडल्यामुळे सौंदर्य हरपल्याची खंत साईभक्त तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली.
साईभक्त कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाबांचा स्पर्श झालेल्या ठिकाणाचा शोध घेऊन त्या ठिकाणी काही काळ वास करून आपले जीवन धन्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पैकीच शिर्डीतील लेंडीबाग एक पवित्र ठिकाण मानले जाते. या ठिकाणी खूप फुलझाडे लावण्यात आली होती. त्यामुळे आलेला भक्त या फुलझाडांमध्ये रमून बाबांच्या आठवणी शोधण्याचा पर्यंत करीत असे. साई मंदिर, द्वारकामाई, चावडी आदी ठिकाणी भक्तांना दीर्घकाळ थांबता येत नसल्याने एकमेव पर्यायी जागा म्हणून लेंडी बागेत थांबत असे. दरम्यान काळानुरूप या लेंडी बागेत खूप मोठा बदल बघायला मिळाला.
येथील वृक्ष आणि फुलझाडी तोडल्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. अशातच साईसमाधी शताब्दीच्या निमित्ताने ध्वज स्तंभाची आणि दीपमाळेची उभारणी करण्यात आल्यामुळे फुलझाडांची जागा काँक्रिटने घेतल्याने बाबांनी योग साधना केलेली लेंडी बाग काळाच्या ओघात नामशेष होते कि काय अशी भीती साईभक्त व ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. या अगोदर साईबाबा संस्थानचा कारभार तहसीलदार पदाच्या अधिकार्‍यांकडून चालविला जात असे. आता तोच कारभार आयएएस अधिकार्‍यांच्या खांद्यावर दिल्याने बाबांनी वास्तव्य केलेल्या जागा जतन करण्याऐवजी पतन होताना दिसत आहेत.
तसेच देशाचे महामहीम राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी लेंडी बागेचा चेहरा मोहरा बदलण्याचे दुःख प्रत्येक साईभक्तांच्या मनात बोचत राहील. या लेंडी बागेचे टाळे संस्थान कधी खोलणार याकडे साईभक्तांचे तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*