शिर्डीत ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा : लाखोचा मुद्देमाल जप्त

0

शिर्डी (शहर प्रतिनिधी) –शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑनलाईन कसीनो अड्ड्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस व लोणी पोलिसांच्या संयुक्तीक कारवाईत छापे टाकून तरुणांना ताब्यात घेऊन लाखो रुपयांच्या संगणक साहित्यासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुरूवार दि. 17 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान शहरात छापेमारी करण्यात आली. शहरात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी तसेच अवैध धंद्याचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र बघावयास मिळत आहेत. याची गंभीर दखल घेत शिर्डीचे उपविभागिय अधिकारी डॉ.सागर पाटील यांच्या आदेशाने लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या पथकाने तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शहरात चालू असलेल्या कसीनो अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात संगणक साहित्यासह अनेक तरुणांना ताब्यात घेण्यात आले.
या छापेमारीत अनेक किंमती मोबाईलसह रोख रक्कमही मिळून आली या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम शिर्डी पोलीस करीत होते.

दरम्यान हा ऑनलाईन जुगार किती दिवसांपासून शिर्डीत सुरू होता. याची माहिती घेऊन पोलिसांनी कारवाई करावी, यासह या जुगारीत किती जण फसले गेले याची माहिती घेऊन संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

ऑनलाईन कसीनो खेळात ग्राहकाला पॉइंट विकत घेण्यासाठी रोख पैसे मोजावे लागतात. शंभर रुपयांत शंभर पॉइंट मिळतात. पॉइंट संपले की बाहेर व्हावे लागते. या ऑनलाईन कसीनोत 10 प्रकारचे खेळ खेळले जातात. एका खेळात 10 रुपयाला 360 रूपये मिळतात.100 रूपयाला 3 हजार 600 रुपये तर 1 हजार रुपयांना 36 हजारापर्यंत पैसे मिळतात.

LEAVE A REPLY

*