Thursday, May 2, 2024
Homeराजकीयशिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

शिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईनिर्माण गृप आणि

- Advertisement -

नगरसेवकांसमोर जगन्नाथ गोंदकर यांना सव्वा वर्षानंतर नगराध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळणार की अन्य नगरसेवकांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकणार याकडेच शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान आम्हाला नगराध्यक्ष पदाचा विखे पाटील पिता पुत्रांनी दिलेला शब्द निश्चित पाळतील अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली असून आता विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

शिर्डी नगरपंचायतीत विखे प्रणित भाजपाचे पूर्ण बहुमत असून गत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साईनिर्माण गृचे जगन्नाथ गोंदकर यांनी विखे पाटील यांना नगराध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते.

मात्र विखे यांनी अर्चनाताई कोते यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करताना साईनिर्माण ग्रुपला सव्वा वर्षानंतर अनुक्रमे जगन्नाथ गोंदकर व अशोक गोंदकर यांना सव्वा-सव्वा वर्षासाठी नगराध्यक्ष करण्याचा शब्द दिल्याने विजय कोते यांनी त्यांच्या नगरसेवकांची समजूत काढल्याने विखे गटाचे बंड काही प्रमाणात शकले होते.

अर्चनाताई कोते यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीला सव्वा वर्षाची कारकिर्द संपवून दोन वर्षाचा कालखंड झाला असल्याने विखे पाटील या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. नगराध्यक्षांचा राजीनामा देवून विखे पाटील यांनी गत निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करून जगन्नाथ गोंदकर यांना नगराध्यक्ष करावे यासाठी आता नगरसेवकांमध्ये लॉबींग सुरू झाले आहे.

मध्यंतरी लॉकडाऊन असल्याने नगराध्यक्षांना तीन महिन्यासाठी नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी द्यावी यासाठी सत्ताधारी अर्चना कोते समर्थकांची मागणी पूर्ण झाली असल्याने आता साई निर्माणचे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विखे पाटील यांनी गत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी नगरसंवकांकडून प्रचंड दबाव येत असल्याने विखे यातून का, मार्ग काढतात याकडेच आता शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.

आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जगन्नाथ गोंदकर यांना पुढील सव्वा वर्षानंतर नगराधक्ष पदाचा शब्द प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासमोर दिला होता. करोनाच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी तीन महिण्यासाठी वाढीव संधी द्यावी, अशी विनंती केली होती. आता तीन महिन्याचा कालावधी संपला असल्याने विखे पाटील यांनी निर्णय घेवून दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. विखे पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे.

– विजय कोते, अध्यक्ष साईनिर्माण ग्रुप शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या