शिर्डीत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

0
शिर्डी (प्रतिनिधी) – फटाकेमुक्त दीपावली साजरी करून पर्यावरण वाचवा आणी आरोग्य सांभाळा हा संदेश विद्यार्थ्यांना दिला जात आहे. शिर्डीच्या साईनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाके वाजवणार नाही अशी शपथ घेतली.
साईंच्या नगरीतून या फटाकेमुक्त दीपावलीचा संदेश जगभरात साईभक्तांच्या माध्यमातून गेला. राज्य सरकार व सरकारी यंत्रणांनी न्यायालयाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करून पर्यावरणावर विपरीत परिणाम करणार्‍या फटाके वाजवण्यावर व विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केली.
दीपावलीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवल्याने हवेत प्रदूषण वाढून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत असल्याने फटाक्यांच्या विरोधात जाणीव जागृती करण्यासाठी माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांचे सहकारी शहरातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती करित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना फटाकडे वाजवणार नाही अशी शपथ दिली जाते.
त्याचा चांगला परिणाम अलीकडच्या काळात दिसून येत आहे. यंदाच्या दीपावलीतही विद्यार्थ्यांनी फटाके वाजवू नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रमातून शपथ देण्यात आली. येथील साईनाथ विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दीपावलीची शपथ घेऊन आम्ही फटाके वाजवणार नाही आणी दुसर्‍यांना फटाके वाजवण्यापासून परावृत्त करू असा संकल्प सोडला.

यावेळी विशाल कोळपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिर्डी शहरातील सामाजीक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. साईनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मुढाळ, उपमुख्याध्यापिका वनिता बोर्‍हाडे, पर्यवेक्षक दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.    – विजयराव कोते

LEAVE A REPLY

*