Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डी महोत्सवानिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम

शिर्डी महोत्सवानिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम

साईबाबा संस्थानकडून नाताळ व नववर्षाच्या स्वागताची तयारी पूर्ण

शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

- Advertisement -

श्री. मुगळीकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या येणार्‍या साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात 58 हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.

तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा, भक्त निवासस्थान (500 रुम) व सर्व्हे नं. 1 त्रिकोणी जागेत आदी ठिकाणी 35 हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे. साईभक्तांना लाडू प्रसाद पाकिटांचा लाभ सुलभतेने मिळावा म्हणून गेट नं. 4 जवळ 2 अतिरिक्त लाडू विक्री काऊंटर सुरू करण्यात येणार आहे.

तसेच दर्शन रांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दूध सुलभतेने मिळावे यासाठी साईआश्रम, धर्मशाळा, भक्त निवासस्थान (500 रुम), द्वारावती भक्त निवासस्थान तसेच शांतीनिवास इमारतीतील दर्शन रांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर, भक्त निवासस्थान (500 रुम) मंडपात, सर्व्हे नं. 1 त्रिकोणी जागेतील मंडपात आणि साईनिवास अतिथीगृहाच्या समोरील बायोमेट्रीक काऊंटर समोरील मंडपात चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे.

या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांग, मंदिर परिसर, हनुमान मंदिराशेजारील श्रीसाईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात, साईआश्रम, जुने साईप्रसादालय दर्शन रांगेजवळ व नविन श्रीसाईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असून तातडीचे सेवेसाठी याठिकाणी रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात येणार आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी 50 अतिरीक्त सीसीटीव्ही कॅमेरे, 7 एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेकामी 1 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 75 पोलीस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक (20 व्यक्ती), एक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त 200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येऊन याव्यतिरिक्त संस्थानचे 1107 सुरक्षा कर्मचारी आहेत.

सशुल्क पासेससाठी 3 अतिरिक्त काऊंटर सुरू करण्यात आले असून सर्व्हे नं. 1 त्रिकोणी जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी स्वतंत्र काउंटर आणि पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.

नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल शिर्डी महोत्सवानिमित्ताने मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून दुपारी 4 ते 5 यावेळेत अखिलेश चंदन भारव्दाज, लखनऊ, सायं. 6.30 ते 7.30 यावेळेत वनिता बजाज, दिल्ली, सायं. 7.45 ते 8.45 यावेळेत डॉ. पूजा राठोड, जयपूर, रात्री 9 ते 10 यावेळेत नर्सिंग देसाई, पुणे व रात्री 10.15 ते 12 यावेळेत श्रीसाई स्वरांजली संगीत संच, नागपूर आदी कलाकारांचे साईभजन संध्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्रीसाईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार असल्याचे सांगून शिर्डी महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या साईभजन संध्या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मुगळीकर यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या