Type to search

Featured सार्वमत

शिर्डीत गोपिकांच्या दहीहंडीचा थरार

Share

मुंबईच्या तरुणींनी जिंकले 111111 रुपयांचे बक्षीस

शिर्डी (प्रतिनिधी)- काल कृष्णा जन्माष्टमीनिमित्त तसेच साई समाधी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान व वसंतदादा मल्टिस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिर्डीत प्रथमच होत असलेल्या मानाच्या महिला दहीहंडीत मुंबई कुर्ला येथील गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाने डिजेच्या तालावर नाचत गात ही दहिहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक पटकावले. यावेळी शिर्डीतील असंख्य महिलांनी दहीहंडी पहाण्याचा आनंद घेतला.

येथील श्रीराम चौकात श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र गोंदकर व वसंतदादा मल्टिस्टेटचे चेअरमन मुकुंद सिनगर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महिला दहीहंडी सोहळ्यासाठी शिर्डीच्या नगराध्यक्षा योगीताताई शेळके, माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप, नगरेसविका अंजलीताई रवींद्र गोंदकर, शैलेजाताई कोरेगावकर, शिवाजी गोंदकर, संजय गोंदकर, महेबूब सय्यद, आदमभाई शेख, रवींद्र गोंदकर, हरिहर वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष भाऊ कोरेगावकर, छायाताई पोपळघट, वंदनाताई गोंदकर, सविता शेजवळ, छायाताई शिंदे, कविता निकम, वनवासी कल्याण आश्रमाचे संजय कुलकर्णी, दीपक वारुळे, दत्तात्रय गोंदकर, संदीप गोंदकर, अविनाश वाणी, शेखर केकाणे, पोलीस निरीक्षक अरविंद माने आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या महिलांच्या दहिहंडीविषयी नगराध्यक्षा योगिताताई शेळके, माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप,शैलेजाताई कोरेगावकर, शिवाजी गोंदकर यांनी मार्गदर्शन करुन पुढील वर्षी याच ठिकाणी शिर्डीतील महिला व युवतींची महिला पथक तयार करुन ही दहीहंडी फोडतील असा विश्‍वास व्यक्त केला. प्रथम या महिला दहीहंडी पथकाने डिजेच्या तालावर व ढोलताशाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला. त्यानंतर या ठिकाणी लहान मुलींचे लेझीम पथकही भाव खावून गेले. त्यानंतर मुंबई कुर्ला येथील गोरखनाथ महिला दहीहंडी पथकासह तीन पथकांच्या सुमारे 250 महिला व मुलींचा समावेश होता.

नियोजनबध्द आणि कोणालाही इजा होणार नाही अशा पध्दतीने पाच ते सहा स्तर रचण्यात आले आणि सर्वात वर असलेल्या एका लहान मुलीने मोठ्या हिंमतीने ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. ही दहीहंडी उत्सव सोहळ्याचा आनंद शिर्डीसह गावागावातून आलेल्या असंख्य महिलांसह पुरुषांनी तसेच बालगोपाळांनी घेतला. दहीहंडी फोडल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या मुंबई कुर्ला येथील गोरखनाथ महिला दहीहंडी पथकातील सर्व सदस्यांचा 1 लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक, साईबाबांची मूर्ती आणि चषक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी फुगडी खेळून महिलांनी आनंद घेतला. या दहिहंडी दरम्यान साईबाबांच्या घोषणा देवून परिसर दुमदुमून सोडला होता. सुत्रसंचालन मयुर चोळके यांनी तर आभार रविंद्र गोंदकर यांनी मानले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!