Type to search

Featured सार्वमत

शिर्डी मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटिसा

Share

निवडणूक खर्च : खा. लोखंडे, आ. कांबळेंचा खर्च निवडणूक विभागाला अमान्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच्यासर्व 20 उमेदवारांना निवडणूक खर्चाच्या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नोटीस काढली आहे. यात उमेदवार खा. सदाशीव लोखंडे आणि आ. भाऊसाहेब कांंबळे यांच्यासह प्रकाश आहेर आणि प्रदीप सरोदे यांना निवडणूक खर्चात तफावत आहे. तर अन्य उमेदवारांनी खर्च सादर करताना अनेक त्रुटी ठेवल्याबद्दल तर एका उमेदवार खर्च तपासणीच्या वेळी गैरहजर होता. यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीतील सर्व 20 उमेदवारांना नोटिशी बजावण्यात आल्या आहेत.

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक खर्च तपासणीचा पहिला टप्पा गुरुवारी पारपडला. यावेळी तयार करण्यात आलेल्या समिती समोर उमेदवारांकडून सादर केलेल्या खर्चाचा तपाशील तपासून तो निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकर्षानुसार आहे की नाही, याची खातरजमा करण्यात आली. यात निवडणूक रिंगणात असणारे खा. लोखंडे, आ. कांबळे, आहेर आणि सरोदे यांच्या खर्चात तफावत आढळली आहेत.
आ. कांबळे यांनी पहिल्या टप्प्यात 8 लाख 83 हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविले आहेत. प्रत्यक्षात त्यांचा खर्च 17 लाख 36 हजार झालेला आहे. त्यांच्या खर्चामध्ये 8 लाख 53 हजार रुपयांची तफावत आढळून आली आहे. तर खा. लोखंडे यांनी 4 लाख 36 हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविले असून प्रत्यक्षात त्यांचा झालेला खर्च हा 7 लाख 27 असून तफावत रक्कम 2 लाख 90 हजार रुपये असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

खर्चात तफावत असणारे चार उमदेवार वगळता उर्वरित 15 उमदेवारांनी खर्च करतांना बँकेत नव्याने खाते न उघडता खर्च करणे, रोखीने व्यवहार करणे, दूरध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियाव्दारे मतदारांशी वैयक्तीक संपर्क साधने यावर होणार खर्च दडविला आहे. यामुळे यांना ही नोटीस काढण्यात आली असून उमेदवार विजय ज्ञानोबा घाटे यांनी निवडणूक खर्चाच्या पहिल्या तपासणीस गैरहजर होता. यामुळे त्याला नोटीस काढण्यात आली आहे. 48 तासांच्या आता उमेदवारांना या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. पुढील तपासणी 22 एप्रिलला होणार आहे.

17 उमेदवारांचा खर्च लाखाच्या आत
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 20 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांचा निवडणूक खर्च हा एक लाख रुपयांच्या आत आहे. त्यातही संजय सुखदान यांचा खर्च 93 हजार 850 असून बंडखोर भाजपचे बंडखोर भाऊसाहेब वाकचौरे यांचा एकट्याचा खर्च 88 हजार आहेत. उर्वरितांचा खर्च 13 हजार 400 ते 28 हजार रुपयांच्या आत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!