Type to search

maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डीत कडकडीत बंद : भाविकांचा दर्शनासाठी महापूर

Share

शिर्डी ( शहर प्रतिनिधी )- साई जन्मभूमी वादाबाबत शिर्डी शहरासह पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला असला तरीसुद्धा शिर्डीत भाविकांनी साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे. सर्वधर्म सद्भावना परीक्रमेत ग्रामस्थांनी साईंचा जोरदार जयघोष केला.

सकाळी द्वारकामाई समोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रँलीची सुरवात शिर्डी माझे पंढरपूर आरती करून करण्यात आली. शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. ओम साई नमो नमाचा जयजयकार करत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने आर.सी.पी. च्या दोन तुकड्या ,स्ट्रायकींग फोर्सची एक तुकडी , उपविभागीय कार्यालयातील लोणी, कोपरगाव येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासह 150 पोलीस व 12 अधिकारी यांचा समावेश आहे.

रॅलीत खासदार सदाशिव लोखंडे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने राजकीय नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!