Type to search

Featured सार्वमत

युती झाल्यास शिर्डीची जागा भाजपला?

Share

जळगाव मतदारसंघासाठी अदलाबदलाची शक्यता : स्वबळाचीही तयारी

अहमदनगर/जळगाव (प्रतिनिधी)- युतीबाबत अनिश्‍चितता असतानाच शिवसेनेने आगामी निवडणुकीची आक्रमक तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या जळगाव जागेसाठी सेना आक्रमक झाली आहे. पक्षाचे मातब्बर नेते माजी आ.आर.ओ.पाटील यांच्यासाठी मेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचा बेत सेनेकडून आखण्यात आला आहे. युती झाल्यास जळगावच्या जागेवर सेना दावा ठोकणार असून त्याबदल्यात भाजपाला शिर्डीची जागा दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपा आणि सेनेत टोकाला गेलेला वाद सध्या काहीसा कमी झाला आहे. मात्र सेनेकडून निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगावच्या जागेसाठी शिर्डीची जागा भाजपाला सोडण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या शिर्डीत सेनेचा तर जळगावात भाजपचा खासदार आहे. मात्र जळगावचे खासदार ए.टी.पाटील यांच्याबद्दल पक्षात आणि मतदारसंघातही नाराजीचे वातावरण आहे. त्यांना उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत पक्षातच साशंकता व्यक्त होत असताना जळगाव लोकसभेसाठी सेना आक्रमक झाली आहे. शिर्डीत मात्र पक्षाकडू अद्याप कोणतीही मोठी तयारी दृष्टीपथात नाही. उमेदवारीबाबतही स्पष्ट संकेत नाहीत. शिर्डी मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपा आणि सेना स्वतंत्रपणे लढल्यास दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या पक्षांची पावले युतीकडे वळल्याची चर्चा आहे. त्यामुळे मैदानात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवार सध्या संभ्रमात आहेत. युती झाली तर अदलाबदलाची चर्चा जळगाव मतदारसंघातून सुरू झाल्याने शिर्डी मतदारसंघही चर्चेत आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!