Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळाची सेवा पुन्हा विस्कळीत

शिर्डी विमानतळाची सेवा पुन्हा विस्कळीत

येणारी व जाणारी आठ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सेवा खराब हवामानामुळे मंगळवारी पुन्हा विस्कळीत झाली. स्पाईस जेटचे दिल्लीला येणारे व जाणारे एक तर चेन्नईचे दोन येणारे व दोन जाणारे विमाने रद्द झाली. तर इंदूरचे येणारे व जाणारे एक विमान रद्द करण्यात आले.

- Advertisement -

काकडी विमानतळावर दृष्यमानता नसल्याने 14 नोव्हेंबरपासून विमानसेवा बंद होती. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केल्यानंतर 28 व्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 11 डिसेंबर पासून पुन्हा सुरू झाली. टप्प्याटप्याने उड्डाणे पूर्ववत करण्याचे काम विमानतळ विकास कंपनी व विमान कंपन्याचे सुरू होते.त्याप्रमाणे विमानसेवा वाढत होती. मंगळवारी पुन्हा वातावरण खराब असल्याने दुपारच्या विमानसेवेवर परिणाम झाला.

दिल्ली व चेन्नईची मोठी विमानसेवा बंद राहिली. तर इंहिगोचे इंदूरचे एक येणारे व एक जाणारे विमान बंद राहिले. येणारी विमाने इतर ठिकाणी उतरविण्यात आली. दुपारच्या सुमारास येणार्‍या विमानाने अनेक घिरट्या मारल्या. मात्र खराब हवामानमुळे दृष्यमानता नसल्याने ते माघारी फिरले. 28 दिवस विमानसेवा बंद राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.

विमानसेवा पुन्हा सुरु झाल्याने आनंद व्यक्त होत होता; मात्र सहा दिवसानंतर विमानांची सेवा पुन्हा विस्कळीत झाल्याने या विमानतळाच्या सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उभे होत आहे. दोन हजार मीटर पेक्षा जास्त दृष्यमानता येत नसल्याने मंगळवारी अडचण निर्माण झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. विमानतळावरुन जाणारे विमान रद्द झाल्याने या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या