विमानतळाचे नेमके नाव काय; तीन वेगवेगळे फलक

0

शिर्डी विमानतळ, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ

 विमान विकास प्राधिकरणाचा प्रताप

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – महाराष्ट विमानतळ विकास प्राधिकरणाने उदघाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत काकडीचा तालुका कोपरगाव ऐवजी राहता केल्याची चुक ताजी आसतांनाच राष्टपतींच्या हस्ते विमानतळाचे उदघाटन होणार आसल्याने एकाच विमानतळाचे शिर्डी विमानतळ, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व श्री.साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे तीन नावांचे फलक लावण्याचा प्रताप विमानतळ विकास प्राधिकरणाने केला आहे.
त्यामुळे शिर्डी विमानतळाचे नेमके नाव काय याबाबत अद्यापही एकमत नसल्याचे दिसुन येत आहसभ्रम निर्माण झाला आहे.
काकडी येथे विमानतळाचे काम सुरु झाले तेव्हा या विमानतळाचे नाव शिर्डी विमानतळ म्हणुन जाहीर करण्यात आले. तसे फलक त्यावेळीच विमानतळ परिसरात लावलेले आहेत. काकडीतुन विमानतळाकडे जातांना हा फलक स्पष्ट दिसतो. अगदी त्या फलकाच्या शेजारी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने मोठा पोल उभा करुन श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक मराठी व इंग्रजी मधुन लावला आहे.
तर मुख्य प्रवेशद्वारावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळात आपले स्वागत आहे असा मराठीत फलक आहे. असाच फलक इंग्रजीत टर्मीनल इमारतीला दोन्ही बाजुन लावण्यात आला आहे. विमान चाचणीच्या वेळी विमानतळ विकास प्राधिकरणचे व्यवस्थापकिय संचालक सुरेश काकणी यांना काकडी येथील विमानतळाचे नेमके नाव काय आहे असे विचारले असता ते सार्वमतशी बोलतांना म्हणाले, विमानतळाचे नाव शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
मंत्रीमंडळाने विमानतळाचे नाव बदलण्याचा ठराव केला आहे. मात्र त्याला अजुन वेळ लागणार आहे. विधीमंडळाची व इतर मंजुर्‍या मिळाल्यानंतरच ते नाव बदलु शकेल. तोपर्यंत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव राहणार आहे असे सांगितले. जर सध्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव वैधिक असेल तर सुरुवातीला शिर्डी विमानतळाच्या फलकावर प्राधिकरणाने बदल का केला नाही. उदघाटनाच्या आदल्या दिवशी विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ आसा फलक लावण्याची घाई प्राधिकरणाने का केली असा सवाल परीसरातुन उपस्थित होत आहे.

  तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेल्या जमीनी विमानतळासाठी कवडीमोल भावाने दिल्या. मात्र प्राधिकरण शेतकर्‍यांची गरज संपली असे वागत आहे.  यापुढे आम्ही विमानतळ विकास प्राधिकरणाला सहकार्य करणार नाही.  तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेल्या जमीनी विमानतळासाठी कवडीमोल भावाने दिल्या. मात्र प्राधिकरण शेतकर्‍यांची गरज संपली असे वागत आहे.  यापुढे आम्ही विमानतळ विकास प्राधिकरणाला सहकार्य करणार नाही.- प्रभाकर गुंजाळ, अध्यक्ष राजमुद्रा प्रतिष्ठाण काकडी

  काकडीच्या शेतकर्‍यांच्या त्यागातून विमानतळ उभे राहिले त्या गावच्या प्रतिनिधी सरपंचांचे नाव उद्घाटन कोनशिलेवर आवश्यक होते. विमान प्राधिकरणाने कोनशिलेवर नाव टाकले तर नाहीच उलट सरपंच नानूबाई सोनवणे यांना उद्घाटनाच्या आदल्या दिवशी पास देणार असल्याचे सांगून रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवले.मात्र पास दिला नाही. याच उद्घाटनाच्या वेळी काही आधिकार्‍यांचे कुटुंबीय, नातेवाईकांना पास दिले होते.अधिकार्‍यांच्या नातेवाईकांचे विमानतळ उभारणीत योगदान काय आहे. विमानतळ उद्घाटनाचे पास कोणाला व कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले याची चौकशी होणे गरजेचे आहे.  – अनिल गुंजाळ, माजी सरपंच

 

LEAVE A REPLY

*