शिर्डी : विमान प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद

0
शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी विमान सेवेला प्रारंभ होवुन आठवडाभरातच विमान सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हैद्राबाद ते शिर्डी शंभर टक्के तर मुंबई ते शिर्डी विमानसेवेला पन्नास टक्के प्रतिसाद मिळत आहे.
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून दिल्ली, बैंगलोर, तिरूपती येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या इच्छुक आहेत.
गेल्या आठवड्यात शिर्डी विमानतळाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते झाला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मुंबई व हैद्राबाद येथून दररोज विमानसेवा सुरु करण्यात आली. पहिल्या दोन दिवसांचा अपवाद वगळता नंतरच्या आठ दिवसांत या विमान सेवेला विमान प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हैद्राबाद ते शिर्डी आणि शिर्डी ते हैद्राबाद अशा दोन्ही बाजुंनी एअर अलायन्सच्या विमानसेवेला प्रवाशांचा 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. तर मुंबई ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई या विमानसेवेलाही सरासरी 50 टक्के प्रवाशी मिळत आहे.
शिर्डी येथे दरररोज लाखो साईभक्त देशाच्या विविध भागांतून येत असतात. शिर्डी विमानतळाचा शुभारंभ झाल्यावर या विमानसेवेला वाढता प्रतिसाद बघुन विमान कंपन्यांनी देशाच्या विविध भागातून शिर्डीसाठी विमान सेवा सुरु करण्यास उत्सुकता दाखविली आहे.
येत्या महिन्याभरात दिल्ली, तिरूपती, बैंगलोर, भोपाळ आदी ठिकाणाहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहीती विमानतळ कंपनीच्या सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*