शिर्डीतील 27 रस्त्यांवर पथदिवे

0
एक कोटी 42 लाखांची रक्कम साई संस्थान नगरपंचायतला देण्यास मान्यता
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शिर्डीतील 27 रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. या रस्त्यांना पथदिवे बसविण्यासाठी एकूण 14 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च येणार असून या रकमेपैकी साईबाबा मंदिर ट्रस्टचा 10 टक्के हिस्सा एक कोटी 41 लाख 80 हजार रुपये इतकी रक्कम साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेकडून नगरपंचायतीस उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
नगरोत्थान महाअभियानांतर्गत शिर्डी तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. त्याअंतर्गत येथील 27 रस्ते विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यांना पथदिवे बसविण्यासाठी एकूण 14 कोटी 18 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात स्थानिक स्थराज्य संस्थेने 5 टक्के, मंदिर ट्रस्टने 10 टक्के, कर्ज हिस्सा 15 टक्के, तर उर्वरित 70 टक्के शासन अनुदान प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावयाचा आहे. या पार्श्‍वभूमीवर मंदिर ट्रस्टचा 10 टक्के हिस्सा याप्रमाणे एक कोटी 41 लाख 80 हजार इतकी रक्कम साईबाबा संस्थान विश्‍वस्तांकडून नगरपंचायतीस उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

*