Type to search

Breaking News आवर्जून वाचाच धुळे

शिंदखेडा : वाहनाच्या धडकेत बिबट्या (मादी)चा मृत्यू

Share

कुरखळी (वार्ताहर) 

शिंदखेडा तालुक्यातील दभाषी गावाजवळ तापी नदीपात्राच्या दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग क्रं ३ वर काल दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनांच्या धडकेत डोक्याला जबर मार लागून मादी बिबटाचा मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे ४ वर्ष असल्याचा अंदाज नेचर कंझर्वेशन फोरमचे प्रतिनिधी व प्राणीमित्र अभिजित पाटील यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच नरडाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजपूत व त्यांचे गस्तीपथक तात्काळ घटनास्थळी पोहचून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्याचे काम पाहिले.

तसेच प्राणीमित्र व धुळे वनविभागाचे कार्यालयीन सहाय्यक योगेश्वर मोरे घटनास्थळी पोहचून मृत मादी बिबटाचे पाहणी करून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग शिरपूरचे सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव व नेचर कंझर्वेशन फोरमचे प्रतिनिधी अभिजित पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले.

शिंदखेडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण माने, वनपाल डी.बी.पाटील, वनरक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी पोहचून स्पॉट पंचनाम्यासह उत्तरीय कार्यवाहीचे कामकाज पाहिले. पुढे शासकीय वाहनाने शिंदखेडा कार्यालयात ठेवण्यात आले.

यावेळी वनरक्षक संदीप पाटील याचे सह वनमजुर उपस्थित होते. शिरपूर वनविभागाचे वनपाल व वनरक्षक सोबत शिरपूर टोलचे अतिदक्षता पथक व कर्मचारी घटनास्थळी पोहचले याचे सहकार्य लाभले. आज पशुवैद्यकीय अधिकारी शिंदखेडा यांच्या उपस्थितीत मादी बिबटाचे शवविच्छेदन होऊन शासकीय नियमाप्रमाणे त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!