शिंदे ग्रामस्थांचा उड्डाणपुलासाठी रास्ता रोको; नाशिक-पुणे महामार्ग दोन तास ठप्प

0
नाशिक | पुणे महामार्गावरील शिंदे गावालागतचा भरावा पूल रद्द करून त्याठिकाणी उड्डाणपुल उभारण्यात यावा अशी येथील ग्रामस्थांनी मागणी केली होती.

त्यानंतर याठिकाणी काही अधिकाऱ्यांनीयाठिकाणी पाहणी केली होती मात्र कुठलाही विचार न करता याठिकाणी भरावा पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर याठिकाणी अनेक समस्यांचा सध्या सामना करावा लागत आहे.

त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज रस्ता रोको करत हा पूल रद्द करून याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.

रास्तारोको आंदोलनादरम्यान ठप्प झालेली वाहतूक

रास्ता रोको आंदोलनांमुळे परिसरातील वाहतून जवळपास दोन तास ठप्प होती.

LEAVE A REPLY

*