Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या हिट-चाट

Video : काश्मिरी पंडितांचे भीषण वास्तव दाखवणारा ‘शिकारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Share

मुंबई:

प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा बहुचर्चित शिकारा- द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीतचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सत्य कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात काश्मिरी पंडितांची व्यथा आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचा काळ दाखवण्यात आला आहे. ‘शिकारा’चा ट्रेलर पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

1990 मध्ये स्वतंत्र्य भारतात सर्वात मोठ पलायन  झाले होते. त्यात 4 लाख काश्मिरी पंडितांना कश्मीर सोडावे लागले होते. या सिनेमात सादिया आणि आदिल खान या दोन नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. या सिनेमातून दोघे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात सादियाने शांतीची तर आदिलने शिवकुमारने धरची व्यक्तिरेखा साकारली आहे.

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी शिकाराच्या टीमने चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर सर्वत्र शेअर केले होते. या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी हातात सामान घेऊन खिन्नपणे चालताना दिसत आहेत आणि त्यांच्या मागे हजारो लोकांची गर्दी दिसत आहे. यावरून चित्रपटाचा

येत्या 7 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विस्थापित कश्मिरी पंडितांच्या व्यथेसोबतच तेव्हा काश्मिरची काय अवस्था होती आणि पाकिस्तानची प्रतिक्रियाही स्पष्टपणे सिनेमात दाखवण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!