शेवगाव येथील हरवणे हत्याकांड; दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश

0
शेवगाव – येथील विद्यानगर येथे राहणारे माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा अशा चार जणांची हत्या झाली होती.

ही घटना मागील रविवारी (दि.१८) रोजी सकाळी उघडकीस आली होती.

या घटनेच्या आठदिवसानंतर दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजुने तपास केला होता. यासाठी पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलीस पथके काम करत होती.

ही घटना घडल्यानंतर लगेचच तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

*