शेवगाव : दोघा दुचाकी चोरांना पकडले; 15 गाड्या हस्तगत

0

शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव शहरामध्ये पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना पकडले असून त्यांच्याकडून 15 दुचाकी गाड्या व दोन दुचाकींचे सुट्टे भाग जप्त केले आहेत. याप्रकरणी अमोल बबन बांदल (रा. हनुमान टाकळी, ता. पाथर्डी) व किशोर ज्ञानदेव सरोदे (रा. वाघोली, ता. शेवगाव) या दोघांना अटक केली आहे.

या दोघांनी शेवगाव, पाथर्डीसह अहमदनगर, शिक्रापूर, वाघोली, राहुरी आदी ठिकाणाहुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून अजुन चोरीच्या गाड्या त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर, पो. हे. कॉ. महंमद युसुफ सय्यद, पो. हे. कॉ. सुरेश टकले, पो. ना. राजु चव्हाण, पो. कॉ. अशोक बागुल, पो. कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. अशोक काळोखे, पो. कॉ. वजीर शेख, पो. ना. राजेंद्र केदार यांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

*