सुकाणू समितीची आज नगरला बैठक

0
अकोले (प्रतिनिधी) – शेतकरी आंदोलनाचे नियोजन व शेतकरी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज 3 ऑगस्ट रोजी नगर येथे सुकाणू समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील सर्व समविचारी शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, नेते, कार्यकत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा या मागण्यांसाठी राज्यभर संघर्ष सुरू आहे. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र कर्जमाफी करताना अनेक शर्ती व अटी लागू केल्या. परिणामी लाखों शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले.
नगर जिल्ह्यातही अशा प्रकारे लाखों शेतकरी वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने 14 ऑगस्ट रोजी राज्यभर चक्का जाम करण्याची हाक दिली आहे. सुकाणू समितीने दिलेल्या या हाकेनुसार अहमदनगर जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये रास्तारोको करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*