ऊस दराचा तिढा सोडविण्यासाठी कारखाने व सकाणू समितीची आज बैठक

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पुढाकार घेत आज बुधवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता नियोजन भवनात जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी व सकाणू समितीची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती डॉ. अजित नवले आणि बाळासाहेब पटारे यांनी दिली आहे.
उत्पादन खर्चावर आधारित उसाला प्रतिटन 3500 रूपयंांची पहिली उचल द्यावी या मागणीसाठी ऊस उत्पाकद शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. त्यामुळे यापूर्वी 23 तारखेला सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेण्यात आली. पण ती निष्फळ ठरली.
त्यानंतर शेतकरी संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक संगिता डोंगरे यांनी मध्यस्थी करत साखर कारखानदार आणि सुकाणू समितीची बैठक बोलावली आहे. यामुळे आज होणार्‍या बैठकीत काय निर्णय होतो याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*