सुकाणू समितीची सोमवारी साकुरीत बैठक

0

राहाता (तालुका प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सर्व पक्षीय शेतकरी सुकाणू समितीच्या वतिने करण्यात येणार्‍या जक्का जाम आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सोमवार 7 ऑगस्ट रोजी राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची बैठक साकूरी येथे शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित केली असून तालुक्यातील शेतकर्‍यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सुकाणू समितीने केले आहे.

शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी द्या, संपूर्ण वीज बिल माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, या मागणीसाठी नगर जिल्हा सर्व पक्षीय शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहाता तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकर्‍यांची बैठक साकूरी येथे सोमवारी सकाळी 10 वाजता आयोजित केली असून या बैठकीला सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहने समितीचे राजेंद्र बावके, राजेंद्र कार्ले, रावसाहेब गाढवे, विजय सदाफळ, संजय बोठे, सुनील सदाफळ, महेश सदाफळ राजेंद्र दंडवते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*