शेतकरी सेवक मंचचा शेतकरी संपाला पाठींबा

0
नाशिक : कालपासून शेतकरी आपल्या विविध मागण्यासांठी संपावर गेला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांच्या संपाला शेतकरी सेवक मंचचा पूर्णपणे पाठींबा असल्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मंचचे संयोजक सचिन चव्हाण, नितीन पाटील,  पल्लवी धोंगडे, देविदास वाटाणे, सुदाम राजोळे, प्रदीप बोराडे, सुरज चव्हाण, चंद्रकांत चिंचोले, प्रबुध्द खरे, सचिन काळे, सुनिल बोराडे, राम खैरनार, दिपक भावल, कुलजित सिंग यांनी निवेदन सादर केले.

मंचच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांची पुर्तता झालीच पाहिजे व शेतकरी बांधवांचा आवाज शासन दरबारी पोहचविण्यासाठी सर्वच समाज घटकांनी ह्या संपात स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवहान मंचच्यावतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

*