मागेल त्याला शेततळे योजनेत नगर राज्यात अव्वल

0

6 हजार 330 कामांवर साडेचौदा कोटी रुपयांचा खर्च

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेत अहमदनगर जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर आहे. जिल्ह्यात या योजनेत 26 हजार 864 शेकर्‍यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले होते. यातील 6 हजार 330 शेतकर्‍यांचे शेततळे बांधून झाले असून त्यापोटी शेतकर्‍यांना 14 कोटी 51 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांना मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. यात शेतकर्‍यांना शेततळे बांधण्यासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांनी सेवा शुल्कासह ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सहा प्रकारांतील स्टेज पूर्ण केल्यावर कृषी विभाग शेतकर्‍यांचे शेततळे मंजूर करते. त्यानंतर मंडल कृषी अधिकारी संबंधित शेतकर्‍याला शेततळे मंजूर झाल्याचे पत्र देते.
यानंतर शेतकर्‍याने शेततळे बांधून झाल्यावर याबाबतचा अहवाल मंडल अधिकारी यांच्या मार्फत कृषी विभागाला सादर करण्यात येतो. शेततळ्याचा खर्च हा त्या-त्या भागातील जमीन आणि मातीवर अवलंबून राहत असून साधारणपणे 30 मीटर बाय 30 मीटर एवढ्या आकाराच्या शेततळ्याला 60 ते 75 हजार रुपये खर्च येत आहे. जमीन मुरमाड असल्यास हा खर्च साधारण 20 ते 125 हजार रुपयांनी वाढत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

आलेले अर्ज व कंसात पूर्ण झालेले शेततळे –
नगर 1689 (552), पारनेर 1912 (391), पाथर्डी 1755 (345), जामखेड 520 (185), श्रीगोंदा 3859 (610), कर्जत 2435 (1080), नेवासा 2899 (247), श्रीरामपूर 1129 (307), शेवगाव 801 (132), राहुरी 894 (176), संगमनेर 4181 (828), कोपरगाव 2315 (450), अकोले 2515 (639) यांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

*